!!!हरि ॐ!!!
गुरुवार दिनांक(७-३-२०१३) सद्गुरु श्री अनिरुद्ध बापु यांच्या
प्रवचनातील संक्षिप्त भाग
चांगल्या गोष्टी करायला हव्यात. मग संकटात हाक मारायची गरज
लागत नाही. ९९% वेळा संकट असं येतं की हाक मारायलाही वेळ
नसतो. म्हणून आपण आपल्याकडून चुकायचं नाही. २४ मिनिटं त्यांना
पहा, २४ मिनिट तुम्ही त्यांच्याकडे पाहताय म्हणजे तुम्ही त्यांची
काळजी घेत नाही, ते २४ तास तुमची काळजी घेत असतात.
चण्डिकाकुल तुमच्यावर उपकार म्हणून हे करत नाही. तुमच्यावर
त्याचं प्रेम आहे म्हणून करतंय. आपण ह्या प्रेमाला जागलं पाहिजे. हे
प्रेमाचं नातं आहे. आई मुका घेताना जर बाळ चावलं तर आई एक
फटका मारते ना बाळाला. आईचा फटका हे बाळासाठी Tonic असतं.
आईने मुका घेतल्यावर बाळ चावले तर आई फटके मारते, मग आपण
कितीवेळा तिच्या बोटाला चावत असतो. ती देते का आपल्याला
फटका? बापूंवर विश्वास असेल तर थोडातरी प्रयास करा.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापु
No comments:
Post a Comment